ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावणारा अधिकारी अखेर बडतर्फ

0

 

लखनौः उत्तर प्रदेशातील वीज विभागाच्या एका अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयात चक्क दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावल्याच्या धक्कादायक प्रकरणात अखेर अधिकाऱ्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात हा प्रकार उघडकीस आला (officer dismissed for putting up picture of Osama bin Laden in his office) होता. या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर तडकाफडकी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या विद्युत विभागातील एसडीओ रवींद्र गौतम यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनला जगातील सर्वोत्तम अभियंता असल्याचे संबोधत त्याचा फोटो आपल्या कार्यालयात लावला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर उत्तर प्रदेश सरकारने रवींद्र गौतम यांना निलंबित करत चौकशी सुरू होती.
यासंदर्भात बोलताना उत्तर प्रदेश वीज विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओसामा बिन लादेन हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी होता. त्याचा उल्लेख सर्वोत्तम अभियंता करणे अनुचित होते. तरीही गौतम यांनी त्याचा फोटो आपल्या कार्यालयात लावला. त्यांच्या या कृतीमुळे वीज विभागाची प्रतिमा मलिन झाली. गौतम यांनी लादेन ऐवजी महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावायला हवे होते, प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर गौतम यांनी त्यांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गौतम यांनी त्यांच्या कार्यालयात लादेनचा फोटो लावल्यानंतर आम्हाला अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे सुरुवातीला निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा