तीन वर्षानंतर निघाली शोभायात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

0

नागपूर – श्री रामनवमीच्या निमित्ताने नागपुरातील श्री पोदारेश्वर राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कोरोना संकट, सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध लक्षात घेता तीन वर्षांपासून ही शोभायात्रा निघू शकली नव्हती. या शोभायात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, माजी मंत्री अनिस अहमद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गजरथ पूजन, आरतीनंतर करण्यात आला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा