नागपुरातील ‘ई-वेस्ट’चे टेंशन होणार दूर

0

मनपा व सुरीटेक्स प्रा.लि.ची विशेष मोहिम, शहरात विविध ठिकाणी संकलन केंद्र, नागरिकांना मिळणार प्रति किलो 15 रुपयांचा दर


नागपूर. ई-कचरा सध्या सर्वत्र समस्या ठरत (E-waste has become a major problem ) आहे. नागरिकांच्या घरी वर्षानुवर्षे ई-कचरा तसाच पडलेला आहे, यापासून संभाव्य धोका त्यांना लक्षात येत नाही. नागपूर (Nagpur) शहरातील ई-कच-याचे योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur NMC) वतीने सुरीटेक्स प्रा. लि. द्वारे मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात मंगळवार 10 व 11 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान विशेष ई- कचरा संकलन मोहीम (Special e-waste collection campaign ) राबविण्यात येत आहे. यानंतर शहराच्या विविध भागात यासाठी केंद्र उभारले जाणार असून, या केंद्रावर या केंद्रावर ई- कचरा सुरीटेक्स प्रा. लि. च्या वतीने १५ प्रति किलो या दराने स्वीकारले जाणार आहे.
नागपूर शहरामध्ये निर्मित होणारा ई-कचऱ्याचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया हे ई-कचरा व्यवस्थापन संशोधन नियम 2018 अन्वये योग्यरीत्या लावण्याकरीता मानपद्वारे मे. सुरीटेक्स प्रा. लि, नागपूर यांना प्रायोगिक तत्वावर काम देण्यात आले आहे. याव्दारे शहरातील विविध भागातून ई- कचरा स्व:खर्चाने संकलीत करुन विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या कंपनीकडून 1 जानेवारीपासूनच काम सुरू करणे अपेक्षित होते. मत्र, त्याला काहीसा विलंब झाला असला तरी संकलन सुरू झाल्याने मोठा दिलास मिळाला असून ‘ई-वेस्ट’चे टेंशन होणार दूर होणार आहे.

शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट


नागपूर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांनी स्वतःच्या घरातील वापर केलेल्या/उपयोगी नसलेल्या ई-वेस्ट जसे नादुरुस्त ईलेक्ट्रॉनिक/ ईलेक्ट्रीकल उपकरणे ईत्यादी वस्तू या विशेष संकलन केंद्रावर मे. सुरीटेक्स प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींकडे जमा करावे आणि शहरामध्ये निर्माण होणाऱ्या ई-वेस्टची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.


नागरिकांनी आपल्या घरात वर्षानुवर्षे पडून राहिलेले बॅटरी, बंद पडलेले मोबाईल, चार्जर, रिमोट, हेडफोन व अन्य ईलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन केंद्रावर आणावे.

  • राम जोशी, अतिरीक्त आयुक्त, मनपा