बीड- राज्यातील सत्तासंघर्षानंतर बीडमध्ये ठाकरे गटाची पहिली महाप्रबोधन सभा होणार आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. संजय राऊत पहिल्यांदाच महाप्रबोधन यात्रेस संबोधित करणार आहेत. सभेपूर्वी शहरात रॅली काढून सभेला सुरुवात होईल, जवळपास पाच हजार शिवसैनिक सभेसाठी उपस्थित राहतील असा विश्वास जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी व्यक्त केला.