जूननंतर देशात मंदी येऊ शकते-नारायण राणे

0

मुंबईः जगामध्ये आर्थिक मंदिचे संकट असून भारताला त्याची झळ बसणार नाही. भारतात मंदी आली तर ती जूननंतर येईल व त्याची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश प्रगती करीत आहे. आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. अमेरिका. चीन, जपान, जर्मनी, यानंतर आपण पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्‍या क्रमांकाची अर्थ व्यवस्था होऊ शकतो, असे राणे म्हणाले.
जी-20 देशांची पुण्यात दोन दिवसीय बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. नारायण राणे या बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.राणे म्हणाले की, अमेरिकेचे सकल घरेलू उत्पादन २० ट्रिलियन आहे. भारत आगामी काही वर्षात ५ ट्रिलियनपर्यंत पोहचणार आहे. देशाच्या प्रगती, आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला याचा फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले. सरकार बदलले की आधीचे सरकारचे निर्णय बदलतात असे कधी होत नाही. एखादा निर्णय आपवदत्मक असेल तरच निर्णय बदलला जातो, असेही ते म्हणाले. राणे यांनी यावेळी जी-२० बैठकीच्या आयोजनावरील भाष्य केले.

राजस्थानी घेवर आणि मक्के की ढोकळी : | Shankhnaad Khadya Yatra Ep.no 73

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा