मुंबई (Mumbai) : सरकार बदलण्याच्या वेळेस ज्या घटना होत गेल्या, त्यातून कायद्याचा लोचाच निर्माण झाला. (Uddhav Thackery)उद्धव ठाकरे यांनी स्वत: राजीनामा दिल्यामुळे (Rabia Case)रेबिया केस येथे लागू होत नाही. हे झाले नसते तर कदाचित न्यायालयाने सकारात्मक विचार केला असता, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले आहे. (Chhagan Bhujbal on SC Verdict on Maharashtra political crisis) यांनी म्हटले आहे.
(Chhagan Bhujbal)छगन भुजबळ म्हणाले की, प्रतोदचा अधिकार राजकीय पक्षाचाच आहे व प्रभू हेच प्रतोद असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती.
ज्यावेळी शिंदेनी त्या सरकारचा पाठिंबा काढला, याचे पत्र राज्यपालांना दिले नव्हते. एकूणच अंतर्गत वादाकडे राज्यपालांनी लक्ष द्यायला नको होते, हे देखील न्यायालायने सांगितले आहे. त्यावेळी शिवसेनेतील आमदार नाराज आहेत, म्हणजे सरकार अल्पमतात आहे, असे कुठे होते, असेही भुजबळ म्हणाले.