Home NAGPUR NEWS “या” शाळेचे उद्घाटन मोठ्या थाटात

“या” शाळेचे उद्घाटन मोठ्या थाटात

0

नागपूर(Nagpur) :- मराठा विद्या प्रसारक समजाद्वारे संचालित, रॉयल मराठा पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाचे सीबीएसई प्री नर्सरी, नर्सरी व के जी शाळेचे या नवीन उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी २७ जून रोजी संस्थेच्या स्व. भाऊसाहेब सुर्वे विद्यालय परिसर, रघुजी नगर,नागपूर येथील संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले(Rich Dr. Raje Mudhoji Bhonsle) यांचे शुभ हस्ते पार पडले. समाजसेवक पराग खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला कार्यकारी मंडळातील पदाधिकारी सर्वश्री प्रविण शिर्के, शिरीष राजेशिर्के, राजेश काटे, दिलीप सस्ते, निलेश चव्हाण, डॉ.प्रकाश मोहिते, सतीश मोहिते, महेंद्र शिंदे, अविनाश घोगले, हरीश इंगळे, सौ.अनिताताई जाधव, सौ.ममताताई भोसले, वीरसिंहराव जाधव, गजाननर कावळे, अमर पिसाळ, सुशांत शिंदे उपस्थित होते. तसेच स्व.भाऊसाहेब सुर्वे विद्यालय व सक्करदरा प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते.