यवतमाळ – येथील अमोलकचंद कॉलेज रोडवर असलेल्या झोपडपट्टीत एका घराला आग लागली. ही आग धुमसत जाऊन तीन घरे आगीच्या तावडीत सापडल्याने जळून खाक झाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे कळू शकले नाही. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. काही दिवस पाऊस, ढगाळ वातावरणानंतर सध्या उन्हाचा तडाखा विदर्भात वाढत आहे.