04MREG1 गोसेखुर्द धरण क्षेत्रात पर्यटनाचा होणार विकास….
राज्य सरकारने 350 कोटी केलें प्रस्तावित
भंडारा ०४ मे : भंडारा जिल्हा आता पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरण क्षेत्रात पर्यटन विकासा साठी 350 कोटींची मंजुरी मिळाली आहे.
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धारण आहे. हे धरण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणत नागरिक येत असतात. त्यासाठी धरण क्षेत्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून स्थानीक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकार कडे पत्र व्यवहार केला. त्यामिळे आता राज्य सरकारने गोसेखुर्द धरण क्षेत्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून 350 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. तर 102 कोटी रुपये मंजूर केला असून आता काहीं दिवसांत याच्या कामाला सुरुवात होईल. गोसेखुर्द धरण क्षेत्रात पर्यटनाचा विकास झाल्यानें परिसरातील एक हजार नागरीकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.