उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही-फडणवीस

0

मुंबई : “मुख्यमंत्रीपदावर असताना उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळेच त्यांचे सरकार परत येऊ शकत नाही. मी स्वतः वकील आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांनी दिलेल्या राजीनामा रद्द करून त्यांना परत आणून बसवणार नाही. न्यायालयात त्यांची हीच मागणी होती”, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडले. फडणवीस म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज लावणे चुकीचे आहे. तो योग्य पद्धतीने येईल, असे मला आमच्या भूमिकेवरून वाटते. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच राहतील, हे माझे भाकित आहे व त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. सध्याचे सरकार स्थिर असून या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाहीत.”
पवारांच्या भूमिकेत बदल नाही

 

राजकारण (political)स्थिरच आहे. शरद पवारांनी कुठेही भूमिका बदललेली नाही. ते काही आमच्या सांगण्यावरून बोललेले नाहीत. ते देशात विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करताहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
राजकारणाची पातळी घसरल्याच्या मुद्यावर फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “हे सारे संपवायचे असेल तर त्याची जबाबदारी माध्यमांना घ्यावी लागेल. सोपी बातमी मिळते, वाद तयार करता येतो म्हणून प्रसार माध्यमे सकाळी ९ वाजता (sanjay raut)संजय राऊतांकडे जातात. त्यातूनच ही सारी समस्या निर्माण झाली आहे. राऊतांकडे जाणे सोडून द्या, त्यानंतर तुम्ही बघा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये पूर्वीसारखं एकमेकांबद्दल आदर असलेली परिस्थिती दिसेल”, असे फडणवीस म्हणाले.

 

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110