उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडीला भेट देणार

0

(Mumbai)मुंबई: (Uddhav Thackeray, former Chief Minister)माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी (Irshalwadi Village)इर्शाळवाडी गावाला भेट देणार आहेत. ते पीडीत कुटुंबीय व स्थानिक गावकऱ्यांची भेट घेणार आहेत. इर्शाळवाडीतवर दरड कोसळून आलेल्या आपत्तीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ११९ जणांचे प्राण वाचविण्यात बचाव व मदत पथकांना यश आलंय. प्रशासनाकडून घटनास्थळी रात्रंदिवस काम सुरु असून पावसामुळे अडथळे येतच आहेत. अद्यापही मातीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाकरे गटाकडून ठाण्यात उत्तर भारतीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होतं. मात्र, हा मेळावा तूर्तास रद्द करण्यात आला असून ठाकरे आता इर्शाळवाडीला जाणार आहेत.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली होती. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी परिसराला भेट देऊन दिवसभर बचाव मोहिमेला मार्गदर्शन केले होते.