Home LOCAL NEWS केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आजपासून महाल येथील गडकरी...

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आजपासून महाल येथील गडकरी वाडा येथे

0

नागपूर (Nagpur): केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे खामला चौक, देवनगर येथील जनसंपर्क कार्यालय उद्या, बुधवार, दि. ३ जून २०२६ पासून महाल येथील गडकरी वाडा येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.

यापुढील सर्व जनसंपर्क व नागरिकांच्या भेटीगाठींसाठी हे कार्यालय महाल येथील गडकरी वाडा येथे कार्यरत राहणार आहे. केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्याशी संबंधित जनसंपर्क, निवेदने, तक्रारी, विकासकामांबाबत सूचना तसेच भेटींसाठीचे नियोजन महाल येथील गडकरी वाडा या कार्यालयातून करण्यात येणार आहे. तसेच मा. मंत्री महोदयांचा जून महिन्याचा जनसंपर्क कार्यक्रम देखील गडकरी वाडा, महाल येथेच होईल, याची नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.