कोव्हॅक्सिनचे लसीकरण ३१ जानेवारी तर कोव्हिशिल्डचे ४ फेब्रुवारीपर्यंत

0

नागपूर : कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला ९००० डोस प्राप्त झाले आहेत. मनपाकडे कोव्हॅक्सीनचा साठा 31 जानेवारी पर्यंत आणि कोव्हिशिल्डचा साठा 9 फेब्रवारी पर्यंतच आहे. नागरिकांनी लवकरात – लवकर या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गापासून बचावाचे मोठे अस्त्र कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी लसीकरणाचे अभियान चालविण्यात आले होते. त्याचेच फलीत म्हणजे शहरात पात्र व्यक्तींच्या संख्येपेक्षा अधिक जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येतो.
केंद्र आणि राज्य शासनाकडून झालेल्या लस पुरवठ्यानुसार शहरात लसीकरण अभियान चालविण्यात आले आहे. झोननिहाय मनपाच्या विविध केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात येत असून लसीकरणापासून अद्याप वंचित असलेल्यांनी त्वरीत आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लसीकरण वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत असणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा