मुंबईसह (Mumbai) राज्यात अनेक भागात पावसानं अखेर हजेरी लावली आहे. आज मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आज कोकणाला यलो अलर्ट आणि कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्टचा इशारा (Maharashtra Rain Update Today) दिला आहे. विदर्भातही पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Monsoon Update)
येत्या तीन-चार दिवसात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आजपासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील अनेक भागात दिसून येणार आहे. (Maharashtra Monsoon Update today Yellow alert for Konkan mumbaid and Maharashtra Rain Update Today)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पाणीसाठ्यात दररोज वाढ होताना दिसत आहे. गेल्या शनिवारी 6.49 टक्क्यांवर आलेला पाणीसाठा आठच दिवसांत 12.85 टक्क्यांवर पोहोचलाय. सध्या धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. रोज 100 ते 150 मिमी पावसाची नोंद होत आहे. मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. धरणांमध्ये 1 ऑक्टोबरला 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणं शक्य होतं.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. धरण क्षेत्रातदेखील पावसाची संततधार कायम आहे.गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर वाढल्याने पेरण्यांच्या कामांना वेग येणार आहे. धरणांचा पाणी पातळीत देखील धीम्या गतीनं वाढ होते आहे.