पत्रकारांसाठी झटणारी तसेच पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबविणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेचं विदर्भ स्तरीय अधिवेशन शहराच्या कस्तुरचंद पार्क जवळील किंग्जवे ऑडिटोरियम येथे पार पडले. या संघटनेच्याअधिवेशनासाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांतून मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे , विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर , व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष राजा माने, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांची उपस्थिती होती.उद्घाटनानंतरच्या दुसऱ्या सत्रात “बदलती पत्रकारिता आणि आव्हाने” यावर राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादासाठी लोकसत्ता चे संपादक देवेंद्र गावंडे , महासागर दैनिकाचे संचालक श्रीकॄष्ण चांडक , शंखनाद न्यूजचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर प्रामुख्याने उपस्थित होते.पत्रकारिता करत असताना ती किती प्रामाणिक आणि कृतिशील असावी, सध्याच्या पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारांना येत असलेल्या अडचणी, समोर असलेली आव्हाने याबाबत उपस्थित मान्यवरांनी मंथन केले.
व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना देशातील पत्रकारांसाठी हक्काची चळवळ
या संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. अवघ्या दोन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे जाळे 28 राज्यात व सर्व केंद्रशासीत प्रदेशात पसरले आहे. संघटनेने 26 हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे आज नागपुरात झालेल्या अधिवेशनात देखील हजारोंच्या संख्येने पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया च्या कुटुंबाचे सदस्य बनले , आज महासागर चे संचालक श्रीकृष्ण चांडक यांना व्हॉइस ऑफ मीडिया परिवारात केंद्रीय सल्लागार पदाची जवाबदारी देण्यात आली, तर शंखनाद चे संपादक सुनील कुहीकर यांची राज्य संघटक म्हणून निवड करण्यात आली. पत्रकारांच्या आर्थिक अडचणींसोबतच त्यांना भविष्यात शासनामार्फत कोणकोणते लाभ देण्यात येईल यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केली. संस्थेचे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक, नागपूर जिल्हा अध्यक्ष आनंद आंबेकर, शहर अध्यक्ष फहीम खान यावेळी उपस्थित होते