नागपूर. (NAGPUR)शिंदे गटात(SHINDE GROUP) गेलेले 16 आमदार अपात्र ठरविले गेल्यास विद्यमान सरकार कोसळेल, असा दावा युतीसरकारच्या स्थापनेपूर्वीपासूनच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्वच घटकपक्षांकडून केला जातो आहे. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी वेगळे मत मांडले आहे. १६ आमदार अपात्र ठरले गेले तरी सरकारला काहीही फरक पडणार नाही, असे गणितच त्यांनी आज मांडले. विशेष म्हणजे, अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्याकडून हे विधान करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मविआ नेत्यांनी त्यांच्या मतापासून काहिशी वेगळी भूमिका मांडली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अजित पवारांचा अंदाज चुकेल, असा दावा केला आहे.
सध्या (AJIT PAWAR)अजित पवरांबाबत अनेक वावड्या उठत आहेत. मागच्या आठवड्यातच अजित पवार अचानक(Not reachable) नॉट रिचेबल झाले होते. यावरून त्यांच्याविषयी चर्चा रंगल्या होत्या, आठवडा लोटला असला तरी चर्चेचे गुऱ्हाळ मात्र कायमच आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या निमित्ताने अजित पवार नागपुरात आले असता त्यांनी शिंदे सरकार स्थिर असल्याचे सांगितले. (BJP-SHIVSENA)भाजप-शिवसेना आणि अपक्ष मिळून १६५ चे संख्याबळ सरकारकडे आहे. १६ आमदार जरी अपात्र ठरले तरी सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहणार आहे. संख्याबळाचे गणित मांडण्यामागील पार्श्वभूमीदेकील रंजक आहे. अलिकडेच माजी मुख्यमंत्री (UDDHAV THACKERAY)उद्धव ठाकरे,(SANJAY RAUT) संजय राऊत यांनी राष्ट्रवादी (CONGRESS)काँग्रेसचे सर्वेसर्वा (SHARAD PAWAR)शरद पवार यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. या भेटीतील चर्चेचा आधार घेत संजय राऊत यांनी सामनातील रोखठोकमधून शरद पवारांच्या कुटुंबावर भाजप प्रवेशासाठी दबाव येत असल्याचा दावा केला आहे. कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांत सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील, असे पवार-ठाकरे यांचे मत पडले, असा दावा राऊतांनी केला आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी अजित पवारांचा अंदाज चुकेल असा दावा करीत आमदार अपात्र ठरल्यास सरकारही कोसळेल असा दावा केला आहे.