नागपूरः (Nagpur)भाजपला (BJP)कोणासोबत जायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मात्र राष्ट्रवादी(CONGRESS) काँग्रेससोबत जाणार नाही, असा इशारा शिंदे गटाकडून भाजपला देण्यात आलाय तर दुसरीकडे या गटाचे खासदार(GAJANAN KIRTIKAR)गजानन कीर्तिकर यांनीही भाजपला सूचक (Shinde group on BJP) इशारा दिला आहे. भाजपला (MAHARASHTRA)महाराष्ट्रात सत्तेची सूत्रे एकहाती मिळालेली नाहीत व यापुढेही मिळण्याची शक्यता नसल्याचे वक्तव्य किर्तीकर यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (AJIT PAWAR)अजित पवार आणि भाजपमधील संभाव्य घडामोडींच्या चर्चेने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अमित शहा-अजित पवार यांच्यात (DELHI)दिल्लीमध्ये बैठक झाली. आणि ही बैठक नियोजित होती, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार(SANJAY SHIRSAT) संजय शिरसाट यांनी केला आहे.
अजित पवार हे भाजपसोबत जाणार या चर्चांनी शिंदे गट हैराण झाला आहे. (Supreme Court)सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तोंडावर आहे. त्यात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार की काय, अशी चर्चा आतापासूनच सुुरु आहे. यामुळे सरकार पडणार नसले तरी शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होऊन काही वेगळी समीकरणे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने राष्ट्रवादीचे नेते (AJIT PAWAR)अजित पवार यांच्याशी यापूर्वीच चर्चा सुरु केल्याची चर्चा जोर धरत आहे. सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाल्यास भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री करेल, या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळेच शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे.
ठाकरे गटाचे खासदार (SANJAY RAUT)संजय राऊत यांनी शरद पवार आणि (UDDHAV THACKERAY)उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय झाले, याचा उल्लेख करताना पवार यांनी कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही पण कुटुंबाला टार्गेट केले जात असल्याचा उल्लेख केला आहे. कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे पवार बोलल्याचे राऊत यांनी नमूद केले. यामुळे सरकार संकटात आल्यास अजित पवार वेगळी भूमिका घेतली, अशी कल्पना पवारांनाही असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच राऊत यांनी यानिमित्ताने दिली आहे. त्यामुळे आगामी पंधरा दिवसात राज्यातील राजकीय संघर्षाला पुन्हा सुरुवात होईल, असे मानले जात आहे.