उद्या  ठरणार विदर्भाचा नंबर 1 शेफ – अभिनेत्री प्रिया मराठे, शेफ विष्णू मनोहर, सपना मुनगंटीवार प्रमुख अतिथी

0

-शंखनादच्या विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : महाराष्ट्र टेलीकम्युनिकेशन्स द्वारे संचालित शंखनाद न्यूज चॅनल आणि पोर्टलच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डीजे आणि टाळ्यांच्या तालावर 50 सर्वोत्तम स्पर्धकांची उद्या रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी घोषणा करण्यात आली. यातून विदर्भातील नंबर 1 शेफ ठरणार आहे .पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५१, २१ आणि ११ हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जातील.- ( Spontaneous response to Vidarbha level cooking competition of Shanknad Nagpur )

( The Vidarbha level cooking competition organized by Shankhnad news channel and portal run by Maharashtra Telecommunications received a spontaneous response on Saturday. ) कोराडी मार्गावरील बोखारा परिसरातील तुली काॅलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी आज झाली. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे, शेफ विष्णू मनोहर आणि सपना मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवारी स्पर्धकांनी त्यांना आवडणारा कुठलाही एक शाकाहारी पदार्थ घरून बनवून आणून तो स्पर्धेच्या ठिकाणी आकर्षक पद्धतीने प्रेझेंट करायचा होता. यानिमित्ताने एकापेक्षा एक सरस पाककृती साकारल्या गेल्या. आजवर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद, स्पर्धकांचा उत्साह आम्ही बघितला नाही. पापड आणि टोस्टपासून अनेक इनोव्हेशन्स पहायला मिळाल्याची दाद परीक्षकांनी दिली. या अतिशय चुरशीच्या फेरीतून 50 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यांना परीक्षकांनी शेफ cap आणि उद्याचे अंतिम फेरीचे निमंत्रण देत सन्मानित केले. उद्या रविवार २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम स्पर्धेत सावजी पद्धतीचा कुठलाही एक शाकाहारी पदार्थ आणि पोळी तयार करायची आहे. अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना शंखनाद वाहिनीवरील खाद्ययात्रा मालिकेत आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे. (The top 50 contestants were announced to the tune of a DJ and applause for the finale tomorrow, Sunday. This will make the number 1 chef in Vidarbha. Cash prizes of Rs 51, 21 and 11 thousand will be given to the first three winners respectively) 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा