नागपूर : मेडिकल रुग्णालयातील मार्ड अर्थात निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात एका महिला डॉक्टरचे दुसऱ्या निवासी डॉक्टरकडून आंघोळ करताना मोबाईलवर व्हिडियो काढण्याचा प्रयत्न झाला. मेडिकल प्रशासनाने तक्रारीनंतर सहा सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली आहे.
मेडिकलमध्ये निवासी डॉक्टरांसाठी स्वतंत्र वसतिगृह असून महिला व पुरुष डॉक्टरांच्या निवासाची सोय आहे. गुरुवारी रात्री द्वितीय वर्षाला असलेली महिला निवासी डॉक्टर आंघोळीला गेली असताना एका निवासी डॉक्टरने मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. याविषयीची
शुक्रवारी दुपारनंतर अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या कार्यालयात तक्रार करण्यात आली. तातडीने वसतिगृहाचे वॉर्डन डॉ. गौर व निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसह बैठक घेत संबंधित डॉक्टरच्या मोबाईलची तपासणी केली असता कोणतेही छायाचित्र वा चलचित्र आढळले नाही. तातडीने चौकशीसाठी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलेवार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, डॉ. मनीष ठाकरे, डॉ. जयेश मुखी यांची सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली.
महिला डॉक्टरचा निवासी डॉक्टरने काढला व्हिडिओ, चौकशीला वेग
MAHARASHTRA
LOCAL NEWS
LOCAL NEWS



















