चांद्रयान 3 साठी चोपड्याच्या सुपुत्राची महत्वपूर्ण कामगिरी

0

 

जळगाव- भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान 3 चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेमध्ये जळगाव जिल्ह्याचे चोपडा तालुक्यातील हातेड गावाचे वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद जैन (देसर्डा) यांचा सुपुत्र संजय जैन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संजय जैन गेल्या 20 वर्षांपासून शास्त्रज्ञ म्हणून ईस्त्रोत कार्यरत आहे. चांद्रयान 3 साठी त्यांनी द्रवरूप इंधनावर काम केले. या यशस्वी प्रक्षेपणानंतर यांचे वडील व आई यांनी आनंद व्यक्त केला. मुलाबद्दल अभिमान वाटतो त्याचा या यशस्वी कामगिरीला शुभेच्छा देऊन येणाऱ्या कालावधीमध्ये ईस्त्रोचा चेअरमन सुद्धा होऊ शकतो, असे मत व्यक्त केले आहे. संपूर्ण पंचक्रोशीचे समाजाचे नावलौकिक केल्याबद्दल आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.