Home Artical Blog लायन्स क्लब ऑफ नागपूरच्या अध्यक्षपदी विनोद गुप्ता

लायन्स क्लब ऑफ नागपूरच्या अध्यक्षपदी विनोद गुप्ता

0

सुनील कुहीकर सचिव, तर सतिश जैन कोषाध्यक्ष

नागपूर :
लायन्स क्लब ऑफ नागपूरच्या नवीन वर्षासाठीच्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, यात अध्यक्षपदी नागपुरातील युवा उद्योजक व व्यापारी नेते विनोद गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. सचिव पदी पत्रकार सुनील कुहीकर, तर कोषाध्यक्षपदी सतीश जैन यांची निवड करण्यात आली आहे.
लायन्स क्लब ऑफ नागपूर, या नागपुरातील सर्वात पहिल्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. विद्यमान अध्यक्ष निधीश सावरकर, सचिव गुरसिमरन कौर, कोषाध्यक्ष रवी किशनपुरीया यावेळी मंचावर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी रमेश जसोरे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणची घोषणा केली.
नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी गुरसिमरन कौर यांची उपाध्यक्षपदी, नीलिमा सावरकर यांची सहसचिव पदी, तर सह कोषाध्यक्षपदी शीतल वर्मा यांची निवड जाहीर करण्यात आली. माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार जयप्रकाश गुप्ता, उद्योजक संजय गुप्ता, प्रकाश वाघमारे यांची सल्लागार म्हणून, राजकुमार अग्रवाल, रवी किशनपुरिया, किशोर भैय्या, विनीत सोंधी, नंदू अग्रवाल, किशोर कुंजेकर, सागर शिवहरे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. पियुष बारोट, राजेश खापेकर, नितीन वर्मा, राजेश जिंदल, जसविंदरसिंह खुराणा, उमेश महतो, सचिन अग्रवाल प्रभृती या कार्यकारणीमधील अन्य पदाधिकारी असतील.

#LionsClub #LionsClubNagpur #Nagpur #NagpurNews #Leadership #NewCommittee #ExecutiveBody #VinodGupta #SunilKuhikar #SatishJain #SocialService #CommunityLeaders #NGO #TeamAnnouncement #CityNews #PublicService #LeadershipTeam #NagpurUpdates #IndiaNews #LocalNews #GroundReport #MarathiNews #ShankhnaadNews