बुलडाणा जिल्ह्यात जलजागृती सप्ताहास सुरुवात

0

बुलडाणा: जागतिक जल दिनानिमित्त 16 ते 22 मार्च या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी.तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या नद्यांचे जलपूजन करून यावेळी जलप्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश असून, यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील चौधरी यांनी केले आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा