आज स्त्री शिक्षणाच्या जनक म्हणवल्या जाणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांची पुण्यातिथी आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना, प्लेगच्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांनाही प्लेगने गाठलं आणि सावित्रीबाईंनी आपला देह ठेवला.सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले अत्यंत आग्रही होत्या. त्यासाठी त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली. मात्र समाजातल्या त्याकाळच्या लोकांकडून त्यांच्यावर प्रसंगी शेण आणि दगडांचा मारा केला गेला मात्र त्यानं सावित्रीबाई खचल्या नाहीत.
१ जानेवारी, इ. स. १८४८ साली सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरु केली.
सावित्रीबाई फुले एक कवयित्री, महान समाजसुधारक आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते.
१८४८ मध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत मुलींसाठी शाळा स्थापन केली. त्यांचे पती ज्योतिबा हे देखील सामाजिक कार्यकर्ते होते.
१८४० मध्ये वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह १२ वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला, ते अत्यंत बुद्धिमान, क्रांतिकारी, भारतीय विचारवंत, समाजसेवक, लेखक आणि महान तत्त्वज्ञ होते. त्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले.
महिलांच्या हक्कांसाठी लढत असताना, सावित्रीबाईंनी विधवांसाठी केंद्र स्थापन केले आणि त्यांच्या पुनर्विवाहालाही प्रोत्साहन दिले.
त्या काळी मुलींच्या शिक्षणावर सामाजिक बंधने असताना सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी १८४८ साली केवळ ९ विद्यार्थीनी घेऊन शाळा सुरू केली.
सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांना मूलबाळ नव्हते. म्हणून, त्यांनी यशवंत राव या ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात खूप विरोध झाला, त्यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व संबंध संपवले.
त्या काळी दलित आणि खालच्या जातीतील लोकांनी गावात जाऊन विहिरीचे पाणी घेणे योग्य मानले जात नव्हते, ही गोष्ट त्यांना खूप त्रास देत होती, म्हणून त्यांनी दलितांसाठी विहीर बांधली, जेणेकरून त्यांना सहज पाणी पिता येईल. सावित्रीबाईंनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढण्याचे कार्य सुरूच ठेवले.
महिला शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल १८५२ मध्ये तत्कालीन ब्रिटीश सरकारने फुले दाम्पत्याला सावित्रीबाईंच्या सन्मानार्थ टपाल तिकीट देऊन सन्मानित केले होते आणि केंद्र व महाराष्ट्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ अनेक पुरस्कारांची स्थापना केली होती.
पुण्यात प्लेगच्या वेळी अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या सावित्रीबाई फुले यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना स्वतःलाही प्लेगचा त्रास झाला आणि त्याच काळात त्यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.
ज्योतिबा फुले 13 वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई 10 वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ नऊ मुली होत्या.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.सावित्रीबाई फुले यांनी जातीयता आणि पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध लढा दिला. मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळ उभारली. कवयित्री असलेल्या सावित्रीबाईंनी समाजातील विषमता, भेदभाव, जातीय अत्याचार आणि बालविवाहाच्या विरोधात सातत्यानं आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लढा दिला. महिलांना शिक्षण मिळावं, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळावी, हक्क मिळावा यासाठी सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचा वारसा आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आहे. सावित्रीबाई यांचे वयाच्या 66 व्या वर्षी बुबोनिक प्लेगमुळे (Bubonic Plague) निधन झालं.