अमरावती (Amarawati): अजित पवार (Ajit Pawar)यांनी विचारधारा बदलली तर ते आमच्या सोबत येण्यास आम्हाला अडचण नाही.स्वतःचे कार्यकर्ते स्वतःबरोबर टिकले पाहिजे, आमदार स्वतःबरोबर टिकले पाहिजे, त्यामुळे सरकार सोमवारी पडणार आहे, पुढच्या महिन्यात पडणार आहे, दिवाळीला पडणार आहे ,शिमग्याला पडणार आहे असं अजित पवार यांनी 25 वर्ष सांगत राहावं अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी दिली. अजित पवार हे प्रशासक आहे त्यांनी विचारधारा जर त्यांनी बदलली आणि तो निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर अजित पवार आमच्या सोबत येण्यास आम्हाला काही अडचण असल्याचे कारण नाही असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत (Sanjay Raut) यांचा एपिसोड ९ ते ९:३० असतो हे जनतेला माहित आहे. चांगल्या कामाला आल्यावर असे काही अशुभ विचारु नये. असा टोलाही उदय सामंत यांनी खासंजय राऊत यांना लगावला.