आंघोळीसाठी नदीत उतरला आणि घात झाला

0

वाचा पैनगंगा नदीत नेमके काय घडले

यवतमाळ (Yavtmal). मृत्यू कधी, कुठे, कुणाला गाठेल याचा काही नेम नाही. यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी जवळच्या कोदोरी येथील 37 वर्षीय व्यक्ती रोजच आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर जात होता. त्यात आज सणाचा दिवस असल्याने तो आवर्जून नदीवर गेला. नेहमीप्रमाणे अंगावरील कपडे काढून केवळ पाण्याला स्पर्श केला. तोच विजेचा जोरदार धक्का लागून त्याचा जीव गेला. त्याचे झाले असे की शेतीला पाणी देण्यासाठी नदीवर पंप बसविण्यात आले आहेत. मोटरीचा वायर नदीच्या प्रवाहात पडला. त्यामुले वीज प्रवाह पाण्यात संचारला. त्याला स्पर्ध केल्यानेच त्या व्यक्तीलाही विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

ऐन (Akshay Trutiya)अक्षय तृतियेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

अशोक विठ्ठल कुरमेलकर (३७) असे मृताचे नाव आहे. तो रोजच्या प्रमाणेच शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला होता. त्याने नदीतील पाण्याला स्पर्श करताच, त्याला शॉक बसला आणि पाण्यातच त्याचा मृत्यू झाला. अशोक हा बाराही महिने दररोज सकाळी पैनगंगा नदीवर आंघोळ करायला जात होता. शनिवारी अक्षय तृतीया असल्याने तो आज लवकर आंघोळीसाठी गेला होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. माहिती मिळताच पांढरकवडा पोलिस घटनास्थळावर पोहोचले, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

तुमसरमध्ये तलावात आत्महत्या

तुमसर (Tumsar)येथील विनोबा भावे नगरातील हनुमान तलावात दिनेश रिनायते (३२) रा. इंदिरानगर, तुमसर याने आत्महत्या केली. तुमसर शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. एका दिवसापूर्वीच शहरातील कुंभारेनगरात एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर घटनेची शाई वाळत नाही तोच शनिवारी सकाळी शहरातील हनुमान तलावात दिनेशचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे येथील सकाळी व्यायाम करणाऱ्या नागरिकांना आढळून आले.