चंद्रपूर (Chandrapur). महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district ) दारुबंदी रद्द केली. यामुळे चोरट्यामार्गाने द्यविक्रीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मद्य माफीयांनी सपशेल खोटी ठरविली आहे. मध्य प्रदेशातून चोरट्यामार्गाने विदेशी दारू आणायची त्यावर विदेशी कंपन्यांचे लेबल चिकटवायचे आणि विदेशी मद्याच्या नावाने विक्री (Sale of counterfeit liquor ) करायची, असा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. जलनगर कंजर मोहल्ला येथे या बाटल्या तयार केल्या जात होत्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र ऊर्फ बिट्टु कंजर (२५) याच्या घरावर छापा टाकला. येथून बनावट लेबल जप्त करण्यात आले असले तरी आरोपी रवींद्र फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
बिट्टु कंजर हा घरीच मध्यप्रदेश येथून अवैध्यरित्या विदेशी दारू आणतो. भंगारातून जमा झालेल्या बाटल्या खरेदी करतो. त्यात बनावट दारू जास्त नशा आणणारे अपायकारक असलेले द्रव्य भेसळ करून ती भेसळ केलेली बनावट दारू भरतो. बाटल्यांवर रॉयल स्टेग डीलेक्स व ऑफिसर चॉईस व्हिस्कीचे लेबल लावायचा. लेबल प्रमाणेच नकली झाकण व बूच लावून ती बनावट दारू रॉयल स्टेज व ऑफिसर चॉईस या कंपनीची आहे, असे लोकांना भासवून अवैधरित्या विक्री करीत होता. प्राप्त माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी रविंद्र उर्फ बिट्टु कंजर याचे घरी छापा टाकला. त्यावेळी आरोपी बनावट दारू तयारच करीत होता. पोलिस दिसताच मागच्या दाराने पळून गेला.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणात या दोन विदेशी कंपनीची बनावट दारू मिळाली. बनावट दारू बॉटलिंगकरीता वापरण्यात येणाऱ्या दोन्ही कंपनीच्या जुन्या १८० व ९० मिली मिली क्षमतेच्या रिकाम्या केलेल्या प्लॅस्टिक बॉटल, मध्य प्रदेश शासनाचे कागदी लेबल असलेल्या ऑफिसर चॉईस या कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या विदेशी दारूने भरलेल्या एकूण २९५ नग प्लॉस्टीक बॉटल, रॉयल स्टेज या कंपनीच्या जुन्या १८० मिली क्षमतेच्या बॉटलमध्ये बनावट भेसळ दारू भरून त्याला नविन झाकण व बुच लावून असलेल्या एकूण ३६ नग बॉटल,जुन्या बॉटलचे बूच तोडण्या करीता वापरण्यात येणारे एक कटर, बनावट दारू बॉटल मध्ये भरण्या करीता वापरण्यात येणारी एक प्लॉस्टीक ची चाळी, दोन ५ लिटरच्या प्लॉस्टीकच्या कॅन मध्ये एकूण १० लिटर भेसळ करण्याकरीता वापरण्यात येणारा उग्रवास येत असलेले पाण्यासारखे दिसणारे द्रव्य, एका ५ लिटरच्या कॅन मध्ये भेसळ केलेले लालसर उग्रवास येत असलेले द्रव्य असा बनावट दारू बनविण्याकरीता वापरण्यात येणारा मुद्देमाल मिळून आला.