मुंबईः खासदार संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत, त्यांची चौकशी केली जाईल. तसेच ही स्टंटबाजी आहे का हे देखील तपासले जाणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde on Sanjay Raut Allegation) व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. राऊतांनी जे आरोप केलेत त्याचीही चौकशी करत ही स्टंटबाजी आहे का हे ही तपासले जाईल, असे शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राऊतांनी केलेल्या आरोपाची चौकशी होईल. राज्यसरकार सर्वांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची समिती निर्णय घेईल. राऊतांनी जे आरोप केलेत त्याचीही चौकशी होईल. सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेतले जातात. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कोणाच्याही सुरक्षेत कपात केली जाणार नाही. ही स्टंटबाजी आहे का हे देखील तपासले जाईल. कोण विरोधीपक्षात आहे, याचा विचार न करता गरज असल्यास सुरक्षाही पुरवली जाईल. कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधी पक्षाचा आहे का? हे पाहून आम्ही कोणाच्याही सुरक्षेत कपात करणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राजा ठाकूरच्या पत्नीची तक्रार
दरम्यान, ठाण्यातील गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्याच्या संजय राऊतांच्या आरोपांवर राजा ठाकूरच्या पत्नीने संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने पत्नी पूजा ठाकूर यांनी कपूर बावडी पोलीस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याकडे काय पुरावा आहे? असा सवालही त्यांनी केलाय.
“राऊतांच्या आरोपांची चौकशी करुच, पण स्टंटबाजी देखील तपासू..”: मुख्यमंत्री
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा