नागपूर: ज्ञान विज्ञान पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत करवीर सोल्युशन्स नागपूर तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सिद्धिविनायक हॉल त्रिमूर्ती नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम करवीर सोल्युशनच्या महिलांनी या आनंदोत्सवात 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशात 27 फुगे सोडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश चंद्रिकाताई बैस, पहिल्या महिला लोको पायलट माधुरीताई उराडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांचा साडीचोळी आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ. छायाताई वझलवार यांनी केला. अतिथींनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. यात नृत्य, संगीत आणि कॅटवॉक सादर झाले. यावेळी परीक्षक म्हणून कांचनताई माने आणि बिन्नी खान यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन विनीताताई पांडे यांनी यांनी केले.कार्यक्रमाला सचिव सविताताई मंगळगिरी, कोषाध्यक्ष प्रतिमाताई खटी, करवीर सोल्युशनच्या सदस्या नंदिताताई सोनी,ज्योती दामोरीकर, संजीवनी चौधरी, स्नेहल बऱ्हाणपुरे,पूजा किरणाकर, इंदिरा कबाडे, माधवीताई सुपसांडे, जयश्री मुदलियार, शालिनी मुदलियार, अश्विनी घाटे, कुमुदिनी देशमुख, मोनिका पात्रीकर ,अरुणा जगताप, नीलिमा ढोके, जूमा जाधव, चैताली दाभेकर, शितल भिलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.