लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

0

मुंबई : शैलीदार लेखक व ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर ( Shirish Kanekar) यांचे मंगळवारी सकाळी हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या धक्क्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय खुसखुशित लिखाण करणारे आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांमधीलतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख बरेच प्रसिद्ध होते.