अपूर्व विज्ञान मेळाव्‍याचे बुधवार, 16 नोव्‍हेंबर 2022 रोजी उद्घाटन

0
  • मा. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते विज्ञान संचारकांचा सत्‍कार
    नागपूर, 15 नोव्‍हेंबर 2022
    असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एजुकेशन (एआरटीबीएसई) आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या अपूर्व विज्ञान मेळाव्‍याचे उद्घाटन विद्यार्थ्‍यांचे हस्‍ते दुपारी 12 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त राम जोशी व जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी योगेश कुंबेजकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    एआरटीबीएसईचे यंदाचे रजत जयंती वर्ष आहे. 1998 साली सुरू झालेल्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये विज्ञानाची आवड निर्माण करण्‍याचे तसेच, प्रचार व प्रसारचे कार्य ही संस्‍था अविरतपणे करीत आहे. रजत जयंती वर्षानिमित्‍ताने 16 ते 20 नोव्हेंबेर 2022 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी ४ वाजेदरम्‍यान अपूर्व विज्ञान मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. राष्ट्रभाषा भवन, उत्तर अंबाझरी मार्ग, रामदासपेठ येथे होणा-या या विज्ञान मेळाव्‍यात महानगरपालिकेच्‍या 32 शाळांमधील ६ ते १० व्‍या वर्गाचे २०० पेक्षा अधिक विद्यार्थी 100 हून अधिक विज्ञान प्रयोग सादर करतील.
    मेळाव्‍यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली होती. या कार्यशाळेत मुलांना विज्ञानाचे प्रयोग आणि त्‍याचे सादरीकरण करण्‍यासंदर्भात प्रशिक्षण देण्‍यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्‍युकेशन संस्थेचे सचिव सुरेश अग्रवाल यांनी दिली.

  • विज्ञान मेळाव्‍यादरम्‍यान 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेदरम्‍यान ‘सायन्‍स क्‍वीझ’ चे आयोजन करण्‍यात येणार आहे. शहरातील 32 शाळांतील विद्यार्थी यात सहभागी होतील. विजेत्‍यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात येणार आहेत. फन विथ सायन्स चा पण विभाग येथे बघायला मिळेल. मेळाव्‍याला बंगाल, बिहार, उत्‍तर प्रदेश, मध्‍य प्रदेश आदी राज्‍यातून आलेले ज्‍येष्‍ठ विज्ञान संचारक मार्गदर्शन करतील. ‍ अधिक माहितीसाठी 0712-2523162 या राष्ट्रभाषा भवनच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा