अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

0

पुणेः ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीच्या संदर्भात महत्वाची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची दिलासाजनक माहिती दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली. (Vikram Gokhale health Updates) गोखले यांच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे. ते डोळे ही उघडत आहेत व पुढच्या ४८ तासात त्यांचे व्हेंटीलेटर काढून टाकता येईल, असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला आहे. मागील ४८ तासांपासून गोखले यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सावकाश सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. मागील १७ दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात भरती असलेले गोखले सध्या लाईफ सपोर्ट प्रणालीवर आहेत. ( Natural improvement of actor Vikram Gokhale )


बुधवारी ते कोमात गेल्यावर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना केले होते. बुधवारी सायंकाळनंतर गोखले यांच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण देण्याची पाळी त्यांच्या कुटुंबीयांवर आली होती. 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.


विक्रम गोखले यांचा ३० ऑक्टोबरला 82 वा वाढदिवस साजरा झाला. विक्रम गोखले यांनी आपल्या रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकीर्दीत विविधांगी भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. ही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट प्रचंड गाजले आहेत.

बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा