अमृतसरमध्ये बीएसएफने पाडले ड्रोन

0

भारत-पाक सीमेवर मोठ्या हालचाली : पठाणकोटमध्ये आढळले दोन संशयित


पठाणकोट. देशाच्या सीमावर्ती भागात कडाक्याच्या थंडीसह धुकेही पडू लागले आहे. दृष्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत पाकिस्तानकडून (Pakistan) भारतात घुसखोरीचा प्रयत्न (Attempted infiltration into India) केला जात आहे. भारत – पाक सीमेवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. अमृतसर (Amritsar ) सीमा चौकी दाओक येथे रात्री जवळपास १० वाजताच्या सुमारास एक संशयित ड्रोन आढळून (Suspicious drone detected ) आला. बीएसएफच्या जवानांनी तातडीने कारवाई करत ड्रोन निष्क्रिय केला. याशिवाय अमृतसरच्या पंजग्राई सीमा चौकीच्या हद्दीतही एक ड्रोन दिसून आला. त्यावर फायरिंग केली असता ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परतले. मध्यरात्री पठाणकोट आणि अमृतसर सेक्टरमध्ये तीन ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न केला गेल्याची माहिती बीएसएफकडून देण्यात आली आहे. बीएसएफच्या जवानांनी सतर्कता बाळगत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पठाणकोटच्या सीमेवर बीएसएफच्या १२१ बटालियनला रात्री उशिरा फरईपूर येथील चौकीच्या समोर पाकिस्तानच्या जलाला भागातून घुसखोर दिसले. बीएसएफच्या जवानांनी ताबडतोड फायरिंग केली आणि घुसखोर पाकिस्तानच्या दिशेने पळाले.


हिवाळ्यात घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. यामुळे भारतीय लष्कराकडून सीमांवर चोख पाळत ठेवली जात आहे. एकही घुसखोर भारतात शिरू शकणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यानंतरही पाकिस्तानच्या खुरापती मात्र सुरूच आहेत. पाकिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या पंजाबच्या भागात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. ड्रोन आणि संशयित व्यक्ती दिसल्यानंतर आता भारतीय लष्कराकडून या भागात शोध मोहिम राबवली जात आहे. दृष्यमानता कमी असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. दिवसा लष्कराकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
याआधी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुरक्षादलानं सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नौशेरा सेक्टरमध्ये १७ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारतीय सीमेत येताच भारतीय जवानांनी त्यांना सरेंडर करण्याचं आवाहन केलं होतं. पण सरेंडर न करता ते माघारी फिरत होते. यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. १९ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. त्याच्यासोबत दारुगोळा देखील सापडला आहे.

*बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा