अल्पवयीन मुलाकडून बलात्कार व खुनाची घटना

0


मुंबई: एका १५ वर्षीय मुलाने ८ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला व त्यानंतर ब्लेडने वार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना कल्याण परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलासह एकाला ताब्यात घेतले आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील न्यू मोनिका इमारतीच्या आवारात एका ८ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून नंतर तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत संशयिताला ताब्यात घेतले. संशयीत अल्पवयीन असून एकाचे वय १५ वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


या घटनेत आणखी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून त्याची पोलिसांकडून पुष्टी होऊ शकलेली नाही. दरम्यान, या घटनेमागील एक कारणही पुढे आले आहे. या घटनेतील मृत मुलीच्या वडिलांनी आरोपी असलेल्या मुलास मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मुलाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. चौकशी आटोपल्यावर त्याला बालसुधारगृहात ठेवावे लागणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही घटना उघडकीस आल्यावरपरिसरात मोठी खळबळ उडाली आहे.