वाडी. नागपूर (Nagpur) शहरापासून जवळच असलेल्या वाडी (Wadi) परिसरात अल्पवयीन मुलावर सामूहिक अत्याचाराची संतापजणक घटना (gang rape no minor boy) समोर आली आहे. आरोपींमध्ये 4 अल्पवयीन आणि 3 प्रौढांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून 6 ते 7 मुले त्याचे लैंगिक शोषण करत असल्याचे पीडित मुलाच्या आईला समजले. तिला धक्काच बसला. तिने सासूला सर्व माहिती दिली. त्यानंतर मुलासह पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. वाडीचे पोलिस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. आरोपींमध्ये 4 अल्पवयीन, 3 प्रौढांचा समावेश असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ताब्यातील अल्पवयीन मुलांनी पीडित मुलाला हिलटॉप कॉलनीजवळील मैदानालगत असलेल्या नाल्याजवळील बंद घराच्या उघड्या बाथरुममध्ये जाऊन गैरवर्तन करीत असल्याचे मान्य केले.
पीडित मुलगा 12 वर्षांचा असून तो इयत्ता 8 वीचा विद्यार्थी आहे. दोन मुख्य आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चिंदू ऊर्फ बादल जीवतोडे (18) आणि रवी चवरे (33) अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. वाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 377, 506, 34 पोक्सो कलम 4-8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ताब्यातील अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास डीसीपी अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूपीएसआय शकुंतला धोबडे करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यात नात्यातील आणि ओळखीच्या व्यक्तींकडून अत्याचार होत असल्याचे निष्पन्ना होत असून ही चिंतेची बाब ठरली आहे. दुसरीकडे अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभागही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरला आहे. अशावेळी पालकांनीच मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. दुसरीकडे पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक सुटल्याचे गुन्हगारीच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. अलिकडेच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची संख्या वाढवून मिळाली आहे. त्यामुळे योग्य नियोजनातून गुन्हेगारीला आळा घातला जावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.