आंतराळ क्षेत्रात भारताने रचला इतिहास, पहिले खासगी रॉकेट झेपावले

0

नवी दिल्ली : अंतराळाच्या क्षेत्रात भारताने शुक्रवारी नवा इतिहास रचला. इस्त्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) (ISRO) देशातील पहिले खाजगी रॉकेट ‘विक्रम-एस’ (Vikram-S) यशस्वीपणे आकाशात ( India’s First Privately Built Rocket Launched from Sriharikota) लाँच केले. हैदराबाद येथील स्कायरूट एरोस्पेस कंपनीने हे रॉकेट तयार केले असून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी त्याचे यशस्वी प्रेक्षपण करण्यात आले. हे रॉकेट 81 किलोमीटर उंचीवर पोहोचणार आहे. या मिशनला ‘प्रारंभ’ असे नाव देण्यात आले आहे. ‘विक्रम-एस’ रॉकेटचे नाव भारताचे महान शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई (Founder of ISRO Dr Vikram Sarabhai) यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतासाठी हे फार मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. भारतासाठी नवा अध्याय सुरु झाला आहे.


विक्रम-सबऑरबिटल रॉकेट असे या रॉकेटचे नाव आहे. स्काईरूट एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड (Skyroot Aerospace) या खासगी कंपनीने या रॉकेटची निर्मिती केली आहे. ही एक प्रकारची चाचणी आहे. भारताला या मोहिमेत यश मिळाले तर खाजगी अवकाश रॉकेट प्रक्षेपण क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये भारताचे नाव सामील झाले आहे. या मोहिमेत दोन देशी आणि एक विदेशी ग्राहक असे तीन पेलोड आहेत. विक्रम-एस सब-ऑर्बिटल रॉकेटमध्ये चेन्नईच्या स्टार्टअप स्पेस किड्झ, आंध्र प्रदेशातील स्टार्टअप एन-स्पेस टेक आणि आर्मेनियाच्या स्टार्टअप बाझ्युमक्यू स्पेस रिसर्च लॅबचे तीन पेलोड आहेत. पेलोड म्हणजे रॉकेट प्रक्षेपणासाठी आवश्यक युनिट आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा