आंदोलनांनी गाजविला दिवस

0

नागपूर :राज्याची उपराजधानी नागपुरात कमालीचा गारठा वाढलेला असताना राजकीयदृष्ट्या आज विविध आंदोलनांनी दिवस गाजविला. योग गुरु रामदेव बाबा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर व्यक्त होणारा देशव्यापी संताप लक्षात घेता दिलगिरी व्यक्त केली. मात्र यानंतरही रामदेवबाबा विरोधात विरोधात विरोधकांचा संताप सोमवारीही कायम दिसला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी या विरोधात रस्त्यावर उतरली. पतंजली स्टोअर समोर आक्रमक आंदोलने झाली. दुसरीकडे जिल्हा परिषदेचा 700 कोटी रुपयांचा निधी सरकारने रोखल्यामुळे काँग्रेसचे नेते धरणे आंदोलनाला बसले. माजी मंत्री सुनील केदार जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यनिमित्ताने हिवाळी अधिवेशन जवळ आल्याची चाहूल दिली.