गोशाळा महासंघ महाराष्ट्र नागपूर जिल्हा यांच्या वतीने आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी आमदार श्री प्रवीण जी दटके यांना महाराष्ट्रात गौ सेवा आयोग स्थापनेसाठी निवेदन देण्यात आले. प्रवीण जी दटके यांनी गौसेवा आयोग असलेल्या राज्यांची माहिती व अहवाल मागितला व महाराष्ट्रातील गौसेवा आयोगासाठी २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री व पशुसंवर्धन मंत्री यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.त्यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. गोशाळा.दिल्या. निवेदन देताना गौसेवा महासंघ नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रदीप कश्यप, निराधार गौवंश सेवा फाऊंडेशनचे संचालक आनंद झामड, श्री कृष्णा गौ सेवा संस्था बुटीबोरीचे धर्मेश पारेख उपस्थित होते.