आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला आहे- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

0

आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला आहे . तो कायम राहण्यासाठी आता पूर्ण संधी आहे ज्ञानाचा विस्तार करायला हवा . वैद्यांनी शुद्ध आयुर्वेद चिकित्सा पद्धत अवलंबिल्यास भारताबाहेरही वैश्विक अधिकार व मान्यता मिळेल , असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ . मोहन भागवत यांनी शनिवारी केले .

आयुर्वेद व्यासपीठा’च्या रजत जयंती पर्वाचे औचित्य साधत केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते . व्यासपीठावर आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल , गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , इंडियन मेडिकल कौन्सिलने नेटा आयुर्वेद ग्रंथांचे प्रकाशन मंत्री सर्वानंद सोनोवाल , गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , वैद्य जयंत देवपुजारी , वैद्य विनय वेलणकर व इतर मान्यवर उपस्थित होते . दरम्यान आयुर्वेदाचा जनतेने अंगीकार करावा असे सरसंघचालक डॉ . भागवत म्हणाले , मागील २५ वर्षात ‘ आयुर्वेद व्यासपीठाने उत्तम काम केले . ज्या गुणांमुळे आपणास मान्यता मिळाली , ते सदैव लक्षात ठेवा . आता आयुर्वेदाला जनतेची व शासनाची मान्यता मिळाली . त्यातील सद्गुणांचा विसर पडू देऊ नका . इतर चिकित्सा पद्धतींमध्ये आलेल्या अहंकाराला आयुर्वेदाच्या मूलतत्वावरील संशोधनाच्या माध्यमातून उत्तर द्या . आयुर्वेदाचा जनतेने अंगीकार करावा , अशी स्थिती निर्माण करा , त्यातून वैश्विक अधिकारप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल , असा सल्लाही त्यांनी दिला . आयुर्वेदाचा व्यापार १८ बिलियन डॉलर केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले , २०१४ पर्यंत ‘ आयुष ‘ हा एका विभागापुरताच मर्यादित होता ; परंतु पंतप्रधान मोदींनी आयुष मंत्रालयाची स्थापना केली . यामुळे आयुषने देशातच नव्हे तर जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली . आता जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक चिकित्सा पद्धतीवर काम सुरू केले आहे . ही बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले .

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा