आव्हाडांना निलंबितच करा, बावनकुळे यांची केली शरद पवारांना विनंती

0

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. आमदार आव्हाड यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. अशातच आव्हाड यांना निलंबीतच करा, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule on Jitendra Awhad) यांनी शरद पवार यांना केली आहे. कार्यक्रमा दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप करणारी तक्रार एका महिलेने केली होती. त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यावर आता बावनकुळे यांनीही या वादात उडी घेत आव्हाड यांना निलंबित करण्याची विनंती शरद पवार यांना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी आव्हाड यांचे निलंबन करायला हवे. अशा घटना होत राहतात असे बोलणाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.


बावनकुळे म्हणाले की, आव्हाड यांना आमदारकीचा राजनामा द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा. अजित पवार आणि शरद पवार राजनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करत आव्हाड याचे निलंबनच करा, अशी विनंती करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांनी आपल्याला हात लावून बाजूला केल्याचा आरोप करतानाच त्यांनी आपल्याला पाहताच त्यांनी एक वाक्यही म्हटल्याचे रशीदा यांनी नमूद केलेय. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रशिदा यांनी ट्वीट केला आहे.

*मिंट पाईन ॲपल पुलाव आणि लाल भोपळ्याचे घारगे | Mint Pineapple Pulao Recipe | Epi. 32 |Shankhnaad News*