उद्धव ठाकरेंनी श्रद्धाच्या कुटुंबीयांची माफी मागावी-राम कदम

0

मुंबईः श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण जोरात सुरु असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम कदम (Uddhav Thackeray must apologize in Shraddha case) यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष केले आहे. काल श्रद्धा वालकरने २०२० साली पोलिसांना लिहिलेले पत्र समोर आल्यावर आता भाजपने जाब विचारला आहे. श्रद्धाने चिठ्ठी लिहून तिच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले असताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही. वसुली आणि एका धर्माचे तुष्टीकरण करण्याच्या नादात निष्पाप श्रद्धाचा जीव गेला. तिच्या हत्येला तुम्ही देखील जबाबदार आहात. उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी श्रद्धाच्या कुटुंबियांची हात जोडून माफी मागावी, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.


श्रद्धाची हत्या करणारा आफताब तिला नेहमी मारहाण करत होता. २०२० मध्ये त्याने श्रध्दाला बेदम मारहाण केली होती. यावेळी तीन दिवस ती रुग्णालयात उपचार घेत होती. त्यादरम्यान २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रध्दाने नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यात आफताब विरोधात लेखी तक्रार केली होती. आफताब माझी हत्या करून माझ्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देईल, अशी भीती तिने तक्रारीत व्यक्त केली होती. दीड वर्षांनी श्रध्दाची ही भीती खरी ठरली. आता यावरून जोरात राजकारण सुरु आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी यावर उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे.

*आलू पराठा आणि कटलेट्स रेसिपी ट्रान्सजेंडर मोहिनी सोबत शंखनाद कीचनमध्ये | Epi 39| Aloo Paratha Recipe*