एका डुकराने अडविले दहा गावांचे पाणी
दोन दिवसांपासून पाणीबाणी : महिलांची विहिरीवर गर्दी

0

चंद्रपूर. एका डुकराने दहा गावांचे पाणी अडविले (A pig blocked the water supply of ten villages). शीर्शक वाचून धक्का बसला असेल. असे कसे शक्य, हा प्रश्नही मनात डोकावला असेल. ही भानगड नेमकी काय, कुठली ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात (In Gondpipari taluka of Chandrapur district ) हा प्रकार घडला. त्याचे झाले असे की, पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये डुक्कर अडकून पडले. परिणामी दोन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. पाणी भरण्यासाठी खाजगी विहिरीवर महिलांची गर्दी उसळल्याच चित्र दिसत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात दहा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना आहे. ही योजना ठेकेदारामार्फत चालवली जाते. या योजनेचा पाईपलाईनमध्ये डुक्कर अडकले. त्यामुळ ही योजना ठप्प पडली आहे. अडकून पडलेल्या डुकराला बाहेर काढेपर्यंत पाणीपुरवठा बंदच ठेवावा लागणार आहे.
जलसंकट पाचवीलाच पुजलेले
ही योजना ठेकेदारामार्फत चालवली जाते. कोणत्याही थोड्या-थोडक्या क्षुल्लक कारणासाठीही या योजनेचा पाणीपुरवठा बंद असतो. याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. नळाला पाणी येते त्याहून अधिक तक्रारींचा ओघ ग्रामपंचायत कार्यालयांकडे सुरू आहे. नागरिक सातत्याने तक्रारी करतात. पण, संबंधित ठेकेदाराकडून योजनेचे काम मात्र काढून घेतले जात नाही. वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने जलसंकट या गावांतील नागरिकांसाठी पाचविलाच पुजल्याप्रमाणे ठरले आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात यावे, अशी मागण धाबा ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेकडे केली आहे. योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. गावातील नागरिक नाल्याच्या पात्रात छोटीशी विहीर खोदून तिथल्या पाण्याने तहान भागवितात. पाणी आणण्यासाठी महिलांना मोठीच पायपीट करावी लागते.
नळ योजना असल्याने ग्रामपंचायतीचे विहिरीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरी आहेत. मात्र पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे खाजगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी उसळली असल्याचे दिसून येत आहे