एका षटकात सात षटकार! ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम, घडविला इतिहास

0

अहमदाबाद: विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने (Ruturaj Gaikwad creates history) इतिहास घडविला.उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने एका षटकात सात षटकार ठोकण्याचा  पराक्रम केला. त्याने एका षटकात तब्बल ४३ धावा ठोकत विश्वविक्रमाला गवसणी घातली.  मर्यादित षटकांच्या सामनात एका षटकात सात षटकार व ४३ धावा काढणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उत्तर प्रदेशविरुद्ध रंगलेल्या या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. या कामगिरीसह त्याचा गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षेल गिब्ज, युवराज सिंह, रॉस व्हीटले, लिओ कार्टर, किरॉन पोलार्ड, टी परेरा या महान फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. या फलंदाजांनी सलग सहा षटकार ठोकले आहेत.महाराष्ट्राच्या डावातील 49 व्या षटकात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंह गोलंदाजी करण्यासाठी आला. ऋतुराजने षटकातील चार चेंडूत सलग चार षटकार ठोकले. त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल ठरला.

पण, या चेंडूवरही ऋतुराजनं उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर अखेरच्या दोन्ही चेंडूवर दोन षटकार मारून ऋतुराजने एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला.भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहने (Yuvraj Singh) 15 वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर 30 षटकात 331 धावांचं लक्ष्य ठेवले. महाराष्ट्राकडून ऋतुराजने अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची तडाखेबंद खेळी केली. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज गायकवाडचं हे मागील आठ डावातील सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावला जाऊ शकतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वाचा भाग आहे. ऋतुराज गायकवाडनं 109 चेंडूत शतक पूर्ण केलं आणि 138 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला.

*जाम कोकोनट मफिन्स आणि मशरूम ओनियन पाई | Jam Coconut Muffins & Mushroom Onion Pie* *Recipe Episode 42*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा