एनआयए चे अनेक राज्यांत गँगस्टर्सवर छापे, दहशतवादी-अंडरवर्ल्ड कनेक्शनचा उलगडा

0

नवी दिल्लीः राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील २० ठिकाणी छापे घालून झडतीसत्र सुरु केले आहे (NIA conducts raids in Punjab Haryana Delhi). दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील धागेदोरे तपासण्यासाठी हे छापे घालण्यात आले असून कुख्यात लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भारतात आणि परदेशातील दहशतवादी, गँगस्टर्स आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या संबंधाचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने चार राज्यांतील सहाहून अधिक जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील गँगस्टर्सचे इतर देशांमध्येही संपर्क आहेत. लॉरेन्स बिष्णोई आणि बावना टोळीच्या नावावर भारतात दहशतवादासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या गँगस्टर्सच्या चौकशीच्या आधारे पाकिस्तान-आयएसआय आणि गँगस्टर्सच्या संबंधांची माहिती घेण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी या गँगस्टर्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यासाठी या गँगस्टर्सना परकीय शक्तींकडून आर्थिक मदतही मिळत असल्याचे एनआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे. गँगस्टर-दहशतवाद फंडिंग प्रकरणी आतापर्यंत दोन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. याआधी एनआयएने दोन वेळा कारवाई करत १०२ ठिकाणी छापे टाकले होते. पंजाबमध्ये लॉरेन्स बिश्नोईसह अनेक टोळ्या सक्रीय आहेत. या टोळ्या अंमली पदार्थांच्या व्यापाराशीही संलग्न असून त्यांचा वापर आयएसआयकडूनही होत असल्याचे सांगितले जाते. लॉरेन्स बिश्नोई सध्या कारागृहात आहे. मात्र, तेथूनही तो ऑपरेट करतो, अशी माहिती आहे.

सावजी चीकन आणि खीमा कलेजी रेसिपी | Saoji Chicken Recipe & Keema Kaleji Recipe|Epi 43|Shankhnaad News