कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पुन्हा चिथावणीखोर विधान, राजकीय वातावरण तापले

0

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai Statement) यांनी पुन्हा चिथावणीखोर विधान केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा संदर्भ देताना बोम्मई यांनी फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले असून, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे वक्तव्य केले. कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत, असेही बोम्मई म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बोम्मई यांच्या चिथावणीखोर विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागलेले आहे. केंद्र सरकार यात काही हस्तक्षेप करणार काय, अशीही चर्चा सुरु आहे.


सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा राज्य सरकार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी बुधवारी खोडून काढला. महाराष्ट्रातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. तसेच बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी भाषिकांची गावे मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे लढा देईल, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यावर आता बोम्मई यांनी पुन्हा चिथावणीखोर विधान केले आहे.

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले असून, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असल्याचे चिथावणीखोर ट्वीट यांनी केले आहे. “कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत”, असे विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागले आहे.

*आलू पराठा आणि कटलेट्स रेसिपी ट्रान्सजेंडर मोहिनी सोबत शंखनाद कीचनमध्ये | Epi 39| Aloo Paratha Recipe*