कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मानसिक तपासणी करा-अजित पवार

0

मुंबईः महाराष्ट्रात असलेल्या गावांवर दावा करणाऱे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची मानसिक तपासणी करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. (Ajit Pawar on Cm Basavaraj Bommai) अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना बोम्मई यांनी केलेल्या मागणीवर भाष्य केले. राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यत्र्यांनी कडक भाषेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज दिली पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, वास्तविक कारण नसताना ते राज्यातील गावांवर दावा करत आहेत. महाराष्ट्र त्यांना असा तसा वाटला का. लोकांचे लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न सुरु असून राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यत्र्यांनी कडक भाषेत समज दिली पाहिजे. या आधीच्या काळात अशी वक्तव्य होताना दिसली नाहीत. राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, असे पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, सीमा वादाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. तेथे त्यांनी आपली मते मांडायला हवी होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व थांबवले पाहिजे. त्यांची वक्तव्ये अतिशय निंदनीय आहेत. राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असतो. मग तीच गोष्ट चर्चेत राहते. शेवटी ज्या राज्यातील जनता असते, त्यांना राज्याच्या वतीने बोलावे लागते. त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असतो. राज्याच्या एकतेचा प्रश्न असतो, असे पवार म्हणाले.


बोम्मई यांच्या अंगामध्ये काय संचारले आहे, हे तापसण्याची वेळ आली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोड आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
बेरोजगारी आणि महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी हा सगळा कार्यक्रम सुरु आहे. अशा प्रकारची वक्तव्यं केली की मीडियाही तेच दाखवते, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा