50 लाखांचे दागिने, 2.50 लाखांची रोख जप्त : जाणून घ्या काय आहे भानगड
कानपूर. उत्तर प्रदेशातील (UP) कानपूरमध्ये (कानपूर) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक भूत पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले (Ghosts were a headache for the police ) होते. भूत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अनेक गोष्टी घडवून आणत होता. यासंदर्भात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेक तक्रारीही होत्या. पोलिस तपासही करीत होते. पण, हाती काहीच लागत नसल्याने नागरिकांच्या भीतीत भरच पडत होती. भुताटकीच्या चर्चांनी पोलिसांचीही झोप उडाली होती. पण, आता भूत म्हणून वावरत असलेल्या या चोराला अटक करण्यात पोलिसांना यश (Police arrest him) आले आहे. पोलिसांनी या भूताला पकडून धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने पोलिसांना सोन्या-चांदीच्या खजिन्यापर्यंत नेले. पोलिसांनी त्याच्याकडून 2.50 लाखांची रोख रक्कम आणि जवळपास 50 लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
गोविंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाबौली येथे राहणाऱ्या काम्या वाधवानी यांचं ब्युटी पार्लर आहे. काम्या यांच्या घरात चोरी झाली. 16 ऑक्टोबर रोजी काम्या कुटुंबासह बाहेर गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते, त्याचा फायदा घेत चोरट्याने चोरी केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. फुटेजमध्ये एक तरुण आणि महिला कैद झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चंद्रशेखर याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत वेगळीच भानगड समोर आही. भुताप्रमाणे वावरत अनेक चोरीच्या घटना घडवून आणल्याची बाब मान्य केली. डीसीपी प्रमोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरला स्मॅकचे व्यसन आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले, त्या आधारे पथकाने चंद्रशेखरला अटक केली. त्याच्या सांगण्यावरून बहीण रेणूच्या घरातून सोन्या-चांदीचे बंडल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यासोबतच स्मॅक पुड्याही सापडल्या आहेत.
चंद्रशेखरने पोलिसांना सांगितले की, दिवसा रेकी करायचो. यानंतर रात्रीच्या अंधारात चोरीच्या घटना घडवत असे. बहीण रेणूच्या घरी चोरीचा माल ठेवायचो. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन हिऱ्याच्या अंगठ्या, 21 सोन्याच्या अंगठ्या, 21 ब्रेसलेट, 6 मंगळसूत्र, चार चेन, पाच जोड्या टॉप्स, तीन सोन्याचे लॉकेट, एक ब्रेसलेट असे मोठ्या प्रमाणात दागिने जप्त केले आहेत. दोन कानातले, सोन्याचे हेअर बँड, 9 सोन्याचे लॉकेट, 20 चांदीचे तुकडे, चांदीचे पैंजण, आणि चांदीची नाणी जप्त करण्यात आली आहेत
.