गोंदिया- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया ते कोहमारा मार्गावरील पाटेकुर्रा- भुसारीटोला जवळ काळी-पिवळी ट्रकची
आमोरा-समोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला.तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.१६)
सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात ट्रकचा टायर फुटल्याने संतुलन ट्रकचालकाचे संतुलन बिघडले.ट्रक दुसऱ्या बाजूला गेल्याने समोरून येणाऱ्या काळी पिवळीवर धडकला.या अपघातात काळी पिवळीचा चेंदामेंदा झाला.काळी पिवळीचा छत उडाला..सडक-अर्जुनी तालुक्यातील पाटेकुर्रादरम्यान मुख्य मार्गावर गोंदिया कडून कोहमाराकडे धावणारा ट्रक (एमएच ४० वाय ८४८७) व सडक अर्जुनी कडून गोंदियाकडे जाणारी काळी पिवळीची (एम.एच. ३६, ३१११) धडक झाली.यात काळी पिवळीतील एक जण जागीच ठार झाला तर आठ गंभीर जखमी झाले.त्या आठही जणांना गोंदियाच्या केटीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला.श्याम शंकर बंग (७०) रा.गोरेगाव असे घटना स्थळी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर अंबिका गोकूलप्रसाद पांडे (६१) रा.चिरचाळी डव्वा, सुरेश शंकर मुनेश्वर (२४) रा.कालीमाटी,ता.आमगाव अशी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.इतर गंभीर असलेल्या सहा जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगळे,सहायक फौजदार सांदेकर यांनी घटनास्थळ गाठून
गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी गोंदियाला हलविले.
यांच्यावर सुरू आहे उपचार
या अपघातात गंभीर जखमी असलेले चालक शाकीर अली अब्दुल अली,वनिता भांडारकर,नवेगावबांध येथील टायगर फोर्समध्ये असलेल्या मनीषा चिखलोंडे, दोन अनोळखी पुरुष असून त्यांची ओळख पटली नाही.तर सहावा गंभीर जखमी प्रनोली सतीश राठोड (१५) रा. भुसारीटोला हा गोंदियाच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.दोन गंभीर जखमींना अति दक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.