गोशाला महासघतर्फे शिफारस पत्र : महाराष्ट्रात गोसेवा आयोग स्थापन करा

0

महाराष्ट्रात सध्या लहान मोठ्या ९५० गोशाळा/पांजरापोळ असुन यात वृध्द, भाकड, अपंग व अपघातग्रस्त
तसेच पोलीसांनी अवैद्य वाहतुकीतुन पकडलेले १,८७,००० गोवंशाचे पालन पोषण करण्यात येत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब व अन्य राज्यात गोशाळांचे सक्षमिकरण करण्यासाठी त्या-त्या राज्यांनी राज्य गोसेवा आयोगाची स्थापना केली आहे. तसेच कृषी प्रधान महाराष्ट्र राज्यात शेती, पर्यावरण, रोजगार, यांचा समतोल राखन्यासाठी देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थीक समृध्दी व ग्रामीण क्षेत्रातील रोजगार निर्मीती करीता देशी गोवंशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात संदर्भ क्र. १ अन्वये सन १९९८ चे विधानसभा विधेयकानुसार राज्य गोसेवा आयोग स्थापणेकरीता मंजुरात प्रदान करण्यात आली होती. व संदर्भ क्र. २ नुसार मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतांना गोसेवा आयोग स्थापणे बाबत तांत्रीक व प्रशासकिय कार्यवाही सुरु केली होती.. महाराष्ट्रातील गोशाळांच्या सक्षमिकरणा करीता मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात गोसेवा आयोग निर्माण करण्यासाठी शिफारस पत्र गोशाला महासघतर्फे प्रदीप कश्यप ,अणुदास महाराज , आनंद जैन, प्रवीण कुलकर्णी ,सनत गुप्ता, शुभास भुंजे, विजय किनकर,प्रवीण शंखपगवार यांच्या वतीने आ. श्री मोहन मते यांना निवेदन देण्यात आले