चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी करा

0

चित्रा वाघ यांची मागणी : राजकीय रणकंदाचे संकेत


चंद्रपूर. महविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Govt ) काळात उठवण्यात आलेली दारूबंदी पुन्हा लागू करावी (Prohibition should be reintroduced). दारूबंदी केवळ कागदावर नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Mahila Morcha state president Chitra Vagh) यांनी येथे केली. वाघ यांच्या मागणीने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय रणकंद माजण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महायुतीच्या काळात जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात दारूबंदीचा निर्णय मागे घेतला गेला होता. दारूबंदी आणि दारूबंदीला विरोध असे दोन्ही मतप्रवाह जिल्ह्यात आहे. प्रामुख्याने महिला वर्ग दारूबंदीच्या बाजुने आहे. पण, दारूबंदीनंतर दिसलेल्या दुष्परिणामांचीही त्यांना चिंता आहे. पुरूषांमध्ये सरळ समर्थक व विरोधक असे दोन मत आहे.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या वाघ आज चंद्रपुरात आहेत. ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष अंजली घोटेकर, सुभाष कासुगोट्टूवार, संजय गजपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषेत वाघ यांनी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव जिहाद कायदा लागू करावा, अशीही मागणी केली. संपूर्ण महाराष्ट्रात संघटना वाढवायची आहे. महिलांचे सर्व प्रश्न महिला मोर्चाच्या माध्यमातून सोडवण्यास प्राधान्य असल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. केवळ महिला आहे म्हणून उमेदवारी मिळणार नाही तर त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता असावी. केवळ महिला आहे म्हणून उमेदवारी द्या, हे योग्य नाही. इतर पक्ष व भाजपमध्ये खूप फरक आहे. भाजपमध्ये दबावतंत्र चालत नाही. काम करतात त्यांना संधी मिळते. कुणाला कुठे संधी द्यायची, हे वरिष्ठ नेते जाणतात, असे वाघ यांनी सांगितले.


मंत्री संजय राठोड प्रकरणी बोलताना, न्यायदेवतेवर विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांचा सन्मान ठेवलाच पाहिजे. महिलांनी काही बोलायचेच नाही, अशा पद्धतीने घेरले जाते. काही महिलांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान, ही पद्धत महाराष्ट्रात रुजू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.


दरम्यान, यमतमाळातील घटनेनंतर स्थानिक पत्रकारांनी त्यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. वरिष्ठ पत्रकाराला सुपारीबाज संबोधल्याबद्दल भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय पत्रकार संघाने घेतला आहे. पत्रकार परिषदेवेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने वाघ यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा हात धरून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला होता. याकर्मचाऱ्याची तक्रारही पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा