ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु

0

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale`s health condition very critical) यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाकडून मिळाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात भरती असलेले गोखले सध्या लाईफ सपोर्ट प्रणालीवर असून काल कोमात गेल्यावर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना केले आहे. काल गोखले यांच्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण देण्याची पाळी त्यांच्या कुटुंबीयांवर आली. 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. ( Veteran actor Vikram Gokhale’s condition is critical, treatment is underway in Pune )


विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात वृषाली गोखले यांनी माहिती दिली की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ५ नोव्हेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मध्यंतरी त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती, पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या आरोग्याबाबत बरीच गुंतागुंत निर्माण झाली असून डॉक्टरांचे सध्या प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले.


अफवांवर विश्वास ठेवू नका: राजेश दामले


विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत काल बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांचे स्नेही राजेश दामले यांनी केले आहे. जोपर्यंत डॉक्टर काही माहिती देत नाहीत तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा, असे आवाहनही त्यांनी केले.


विक्रम गोखले यांचा ३० ऑक्टोबरला 82 वा वाढदिवस साजरा झाला. विक्रम गोखले यांनी आपल्या रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकीर्दीत विविधांगी भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. ही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. अग्निपध, अकेला, ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट प्रचंड गाजले आहेत.

आलू पराठा आणि कटलेट्स रेसिपी ट्रान्सजेंडर मोहिनी सोबत शंखनाद कीचनमध्ये | Epi 39| Aloo Paratha Recipe

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा